मनुष्याची आकलनशक्ती केवळ शब्दांतून समजावून घेण्याच्या फार पलिकडची आहे. आता मी बोलतोयं, तेव्हा तुमची जाणून घेण्याची क्षमता तुम्ही ऐकत असलेल्या शब्दांपेक्षा फार प्रचंड आहे.
पण तुमचं मन असं प्रशिक्षित केलं गेलय, कि ते केवळ ऐकतं आणि नोंद करतं नाही, तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतं राहतं. तुमच्यापैकी काही जणांना जे महत्वाचं वाटतंय ते लिहून ठेवण्यासाठी हात वळवळतायत. (laughs). पण मनुष्याची आकलनशक्ती या सर्वाच्या खूप पलीकडे आहे. नुकताच मी....अगदी चारच दिवसांपूर्वी, या देशातील एका ऊच्य पदस्थ पर्यावरण शास्त्रज्ञासोबत चर्चा करत होतो.
आणि....आम्ही याविषयी चर्चा करत होतो, रात्री जेवतांना आम्ही बर्याच गोष्टींवर बोलत होतो.
तर, त्यान विचारलं, सद्गुरू, तुम्ही कोणती पुस्तकं वाचता? मी म्हणालो मी एस्ट्रीक्स (Asterix) आणि डेनीस द मेनीस वाचतो. (Dennis the Menace) (Laughter)
हे वाचत मी वाढलो.
मी सतत इतका फिरतीवर असतो की मला इतर काहीही वाचलाच मिळत नाही, मी जर वर्तमानपत्र वाचू शकलो तर तीच एक मोठी गोष्ट आहे.
“मग हे सगळं ज्ञान तुम्हाला कुठून येतं?”
मी म्हणालो “मी तुमच्यातूनच ते मिळवतोय. ” (Few laugh)
तुम्ही सगळा अभ्यास केलाय, मी पुन्हा तोच अभ्यास का करू? मी ती सगळी पुस्तकं वाचत नाही.
तुम्ही इथ बसला आहात, मी तुमच्याकडूनच ती माहिती मिळवतो आणि त्याबद्दल बोलतो.
“पण हे सगळे तंत्रज्ञानाचे शब्द तूम्हाला कसे येतात?” मी म्हणालो “ते सर्व आत्ता तुमच्या मेंदुमधे नाहीत का?” मी तुमच्याकडून घेऊ शकतो, मला जे हवं ते.
मी त्या निरर्थक गोष्टींचा अभ्यास करतं बसतं नाही कारण नुसते बोजड शब्द माझ्यासाठी निरर्थक आहेत.
कारण, मनुष्याची आकलनशक्ती खूप मोठी आहे, म्हणून मी तुम्हाला सतत सांगत असतो, केवळ माझ्यासोबत असा, माझ्यासोबत राहा. तुम्ही जर पुर्णपणे माझ्यासोबत असू शकलात तर तुमची हे जाणून घेण्याची क्षमता, मी बोललेला प्रत्येक शब्द लिहून घेण्यापेक्षा खूप मोठी असेल. तुमही हे सगळे शब्द जरी लिहून काढले तरी तुम्हाला काहीही कळणार नाही.
खरचं,…मी ते गुपित सांगू का?
एक शब्दकोश विकत घ्या. मी जे बोलतोय ते सगळे त्यात आहे. (Laughter)
नाही?
फक्त ते योग्य क्रमात लावावे लागतील. पण तसे करून तुम्हाला काहीही मिळणार नाही.
म्हणून तुमचं आकलन वाढवणं खूप महत्वाचं आहे कारण ज्याचं तुम्ही आकलन करू शकता केवळ तेच तुम्हाला माहित असतं. बाकी सगळा कल्पनांचा गोंधळ आहे. नाही का?
ज्याचं तुम्हाला आकलन होतं आणि जे तुम्हाला अनुभवातून कळतं तेवढंच तुम्हाला माहीत असतं, बाकी रिकाम्या कल्पना आहेत. कितीही अदभूत कथा असू द्या, शेवटी ती एक कथाच आहे जीचा तुमच्या जीवनात काहीही फरक पडणार नाही. तिला जर तुमच्या आयुष्यात काही बदल घडवायचा असेल तर त्याला एक अनुभवाचा पैलू असायलाच हवा.
आणि ते आकलनाशिवाय कळणार नाही.
तुम्ही विवेकानंदांबद्दल ऐकलंय? हम्म?
Participants: हो
ते या देशात येणारे पाहिले योगी होते. 1893 मध्ये ते इथ आले आणि त्यावेळी इथं त्यांनी बरीच खळबळ माजली. अमेरिकेतून परत जातांना ते युरोपला सुद्धा गेले. तिथं ते एका जर्मन तत्वज्ञाकडे मुक्कामाला होते. रात्री जेवणानंतर, ते अभ्यासखोलीत बर्याच विषयांवर चर्चा करत होते आणि तिथ त्यांच्या टेबलावर एक मोठं पुस्तक होतं. साधारण ७०० पानांचं. तर विवेकानंद म्हणाले....कारण ती व्यक्ति त्या पुस्तकाचं खूप कौतुक करत होती...ते म्हणाले, हे पुस्तक मला १ तासाभरासाठी द्याल का? काय आहे ते मला जरा बघू द्या. तो माणूस हसला.
तो म्हणाला...तुम्ही हे पुस्तक... एका तासात वाचणार? मी ते अनेक आठवडे वाचतोय आणि मी फार पुढे गेलो नाहीये कारण ते फार क्लिष्ट आहे. आणि तसंही हे पुस्तक जर्मन भाषेत आहे, तुम्हाला ती भाषासुद्धा माहीत नाही. तर एका तासात तुम्ही काय कराल?
विवेकानंद म्हणाले, तुम्ही ते मला एक तासासाठी द्या तर, मला एकदा बघू द्या!
तर त्यांना ते पुस्तक दिलं गेलं.
त्यांनी ते पुस्तक आपल्या दोन हातांमध्ये असं धरलं आणि ते डोळे मिटून तिथ बसले.
एका तासानंतर त्यांनी ते पुस्तक परत केलं आणि म्हणाले, यामधे महत्वपूर्ण असं काहीच नाहीये..(Laughter).
त्या व्यक्तिला तो उद्धटपणा वाटला. तुम्ही पुस्तक उघडत देखील नाही आणि त्याबद्दल असं बोलता? ते देखील तुम्हाला न येणार्या भाषेतल्या पुस्तकाबद्दल? तर ते जरा नाराज होऊन म्हणाले हा काय मूर्खपणा आहे?
विवेकानंद म्हणाले, तुम्ही मला त्या पुस्तकाबद्दल काहीही विचारा मी उत्तर देईन.
सांगा, पान ६३३ वर काय आहे?
विवेकानंदांनी शब्द-न-शब्द सांगितला.
तुम्ही कुठलही पान विचारा,
तुम्ही केवळ पान क्रमांक सांगा, ते तुम्हाला कुठल्याही पानावरचा एक एक शब्द सांगतील.
मग त्यांनी विचारलं, हे कसं शक्य आहे?
तुम्ही पुस्तक उघडलं सुद्धा नाही, मग हे कस शक्य आहे?
ते म्हणाले “म्हणूनच..... मला ‘विवेकानंद’ म्हणतात.
‘विवेक’ म्हणजे आकलन.
त्यांचं नाव ‘नरेंद्र’. त्यांच्या आकलनशक्तीमुळे त्यांच्या गुरूंनी त्यांना विवेकानंद नाव दिलं.
ते म्हणाले “म्हणूनच मला ‘विवेकानंद’ म्हणतात.
तर हे जीवनाचे आकलन...नाही.....
ते तुम्ही तार्किक बुद्धीच्या आधारे समजावून घेऊ शकत नाही.
ते तसं कार्य करू शकत नाही कारण ‘तर्क’ तुमच्या जीवनाचा खूप मोठा भाग वगळून टाकतो ज्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही.
सद्गुरु ऍप्प आत्ताच डाउनलोड करा:
सद्गुरु मराठी ब्लॉग
सद्गुरु मराठी फेसबुक पेज
पहा:
0 Comments